कार्तिक पुजारी
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नार्वेकरांच्या संपत्ती किती? हे समोर आलंय.
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.
ते दहावी पास आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये, तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे.
नार्वेकर यांच्या बँक अकाऊंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रक्कम आहे.
नार्वेकर यांच्या स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम 4 कोटी 17 लाख 63, हजार 323 आहे, तर पत्नीच्या मालमत्तेची रक्कम 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 आहे.
गांव मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे 74.80 एकर जमीन घेतलेली आहे. मुंबईतील मालाड आणि बोरिवली येथे 1000 स्क्वेअर फुटाचं घर नावावर आहे.