रुपेश नामदास
उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची असून, रोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, यापेक्षा अधिकची झोप तुमची दिवसभराची दिनचर्या बिघडवू शकते.
ज्या व्यक्ती 9 ते 10 तास झोपतात अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
जर तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर, सकाळी उठून व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.
रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. तसेच वजनही कमी होते. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत राहण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी पाणी न पिल्याने पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते तसेच लठ्ठपणाचेही शिकार होऊ शकता.
सकाळीच्यावेळी नाष्टा करताना टीव्ही पाहू नये. खातांना टीव्ही पाहण्याने तुमचे लक्ष टीव्हीवरच राहते. त्यामुळे तुम्ही किती खात आहात यावर नियंत्रण राहत नाही. यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
सकाळी चहा-कॉफीचे सेवन केले तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. क्रीम आणि साखरेने भरलेली कॉफी आणि चहा वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो.
जेवनाची एक वेळ फिक्स ठेवा. रोज त्याच वेळी जेवन करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.