Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे काय रे भाऊ?

Sandip Kapde

विधी आयोग

22व्या विधी आयोगाने समान नागरी कायद्याबाबत लोक, सार्वजनिक संस्था, धार्मिक संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींकडून महिनाभरात सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा चर्चेत आला आहे.

Uniform Civil Code

हिंदू विवाह कायदा

समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर नवा कायदा लागू झाल्यानंतर हिंदू विवाह कायदा, हिंदू कुटुंब कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ, पारसी लॉ, इसाई लॉ किंवा अल्पसंख्याक धर्मांचे अन्य कायदे रद्द होतील

Uniform Civil Code

समान नागरी कायदा काय ?

त्याजागी एकच कायदा अस्तित्वात येईल. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात समान नागरी कायदा काय आहे.

Uniform Civil Code

समान नागरी कायदा म्हणजे काय?

‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ म्हणजे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान कायदे असणे, म्हणजे समान नागरी कायदा होय.

Uniform Civil Code

समान नागरी कायदा

ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होईल, तेथे लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तकविधान, मुलांची कस्टडी, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबीक संपत्तीची वाटणी, देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी समान असतील.

Uniform Civil Code

समान नागरी कायद्याला विरोध का?

समान नागरी कायदा लागू केल्यास सध्याचे वेगवेगळे कायदे संपणार आहेत. याच कारणामुळे काही धर्माच्या लोकांकडून याला विरोध केला जात आहे.

Uniform Civil Code

विरोध

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यासह काही पक्षांनी हा कायदा असंवैधानिक आणि अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात असल्याचे म्हणत विरोध केला आहे.

Uniform Civil Code

कायदा लागू झाल्यास...

भारत हा विविध जाती आणि समुदायांचा देश आहे. वेगवेगळ्या धर्मांनुसार त्यांचे कायदेही वेगवेगळे आहेत. समान नागरी कायदा लागू झाल्यास त्याचा देशावर आणि इतर धर्मांवर परिणाम होईल.

Uniform Civil Code

विरोध

त्यामुळे या कायद्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा विरोध आहे. वेळोवेळी त्यांनी या कायद्याला विरोध केला आहे.

Uniform Civil Code

समान नागरी कायदा फायदे

समान नागरी कायदा मान्य केल्यावर विवाह, वारसा हक्क यासह विविध मुद्द्यांशी संबंधित कायदे सुलभ केले जातील. सर्व धर्मातील नागरिकांना समान कायदे लागू होतील. हा कायदा लागू झाल्यास सध्याचे इतर सर्व कायदे रद्द होतील.

Uniform Civil Code

धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व बळकट होणार

कायद्यांमध्ये असलेल्या लिंगभेदाच्या समस्येलाही सामोरे जावे लागेल. या कायद्यापासून संरक्षण मिळणार असून, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व बळकट होणार आहे.

Uniform Civil Code

या देशांमध्ये समान कायदा लागू

जगभरात अनेक देशांनी हा कादया अवलंबला आहे. त्यामध्ये यूएसए, आयर्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, तुर्की, इंडोनेशिया, सुदान आणि इजिप्त असे अनेक देश आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uniform Civil Code