सकाळ डिजिटल टीम
IAS Mudra Gairola : नागरी सेवा परीक्षा (UPSC) ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भारतीय या परीक्षेला बसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला IAS अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, जिनं आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी UPSC परीक्षा दिली.
UPSC Success Story : IAS अधिकारी मुद्रा गायरोला ह्या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागच्या रहिवासी आहेत. सध्या त्यांचं कुटुंब दिल्लीत राहतं.
आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. मुद्रा यांनी 12 वी बोर्ड परीक्षेत 97% आणि 10 वी मध्ये 96 टक्के गुण मिळवले होते.
मुद्रा गायरोला यांनी त्यांचं बारावी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्या दंत शस्त्रक्रियेची पदवी घेण्यासाठी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
मुद्रा यांनी तिथंही बीडीएसमध्ये सुवर्णपदक जिंकलं, पण तिनं आयएएस अधिकारी व्हावं अशी त्यांच्या वडिलांची नेहमीच इच्छा होती. त्यामुळं पदवीनंतर मुद्रा यांनी दिल्लीला जाऊन एमडीएसमध्ये प्रवेश घेतला.
मुद्रा गायरोलाचे वडील अरुण गायरोला यांचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न होतं, परंतु ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळं मुद्रा गायरोला यांनी आयएएस अधिकारी व्हावं, अशी त्यांची इच्छा होती.
मुद्रा गायरोलाचे वडील अरुण गायरोला यांनी 1973 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यावेळी तो मुलाखतीत पास होऊ शकला नाही. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्रा यांनी MDS मध्येच सोडलं आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
मुद्रा गायरोला ह्या 2018 मध्ये पहिल्यांदाच UPSC नागरी सेवा परीक्षेला बसल्या आणि मुलाखत फेरीत पोहोचल्या. 2019 मध्ये मुद्रा यांनी UPSC मुलाखत पुन्हा दिली, पण त्यांची निवड झाली नाही.
यानंतर मुद्रा 2020 मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर मुद्रा 2021 मध्ये पुन्हा UPSC परीक्षेला बसली. यावेळी ती 165 व्या क्रमांकानं यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस झाली.
मुद्रा गायरोला यांचं स्वप्न आयएएस होण्याचं होतं, म्हणून त्यांनी 2022 मध्ये पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. ज्यामध्ये ती 53 व्या रँकसह आयएएस अधिकारी बनली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.