Flying Car : क्या बात! उडणाऱ्या गाडीला मिळाली सरकारची परवानगी

Sudesh

उडणारी गाडी

हवेत उडणारी गाडी आपण चित्रपटांमध्ये पाहिली असेल. मात्र आता ही कल्पना सत्यात येणार आहे.

Flying Car Model A | eSakal

सरकारची परवानगी

अमेरिका सरकारने एका हवेत उडणाऱ्या गाडीला अधिकृत मंजूरी दिली आहे.

Flying Car Model A | eSakal

मॉडेल ए

अमेरिकेतील अलेफ एअरोनॉटिक्स या कंपनीने ही कार तयार केली आहे. याला मॉडेल ए असं नाव दिलं आहे.

Flying Car Model A | eSakal

विशेष प्रमाणपत्र

यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या गाडीला 'स्पेशल एअरवर्थीनेस' सर्टिफिकेशन दिलं आहे. अशा प्रकारच्या वाहनाला मंजूरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय.

Flying Car Model A | eSakal

ठराविक परवानगी

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ठराविक कारणास्तव आणि ठराविक ठिकाणीच या गाड्यांना उडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Flying Car Model A | eSakal

इलेक्ट्रिक कार

जमिनीवरून थेट हवेत जाऊ शकणारी ही गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Flying Car Model A | eSakal

किती रेंज?

एका चार्जमध्ये ही गाडी सुमारे ३२२ किलोमीटर धावू शकते, किंवा सुमारे १७७ किलोमीटर अंतरापर्यंत उडू शकते.

Flying Car Model A | eSakal

काय किंमत?

फॉक्स न्यूज या अमेरिकेतील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची अंदाजे किंमत ही ३,००,००० डॉलर्स एवढी असू शकते. या कारमध्ये एक किंवा दोन व्यक्ती प्रवास करू शकतात.

Flying Car Model A | eSakal

कधी मिळणार?

२०२५ च्या शेवटीपर्यंत ही उडणारी कार डिलिव्हर करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्री-ऑर्डर झाल्याचंही कंपनीचे सीईओ जिम ड्युखोव्हनी यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flying Car Model A | eSakal