Vishal Pahurkar
केसांसाठी फक्त बाह्य निगा राखणे गरजेचे नसून अंतर्गत निगा राखणे तेवढेच महत्त्वाचा आहे. केस हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि योग्य त्या शाम्पू कंडिशनर चा वापर करा.
केसांच्या निरोगी वाढीस उपयुक्त असते ते तेल. त्यामुळे स्ट्राँग केसांसाठी तेल कोमट करून त्यानी केसांची मालिश करा.
पावसापासून सुरक्षेसाठी केसांची वेणी, हेअर बन यांसारखे उत्तम पर्याय निवडा.
फिट प्रॉडक्ट्स जसे की हेअjर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर यांसारख्या उपकरणांचा वापर टाळा. त्याचा अती वापर झाल्याने केसांचे नैसर्गिक सौंदर्य जाऊ शकते.
नेहमी केस धुतल्याने त्यातील नॅचरल ऑइल निघून जाते त्यामुळे पावसाळ्यात वारंवार केस देण्याचा मोह टाळा.
अँटी फ्रीज प्रॉडक्ट्स म्हणजेच हेअर सिरम , हेअर क्रीम यांचा जास्तीत जास्त वापर करा.
केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असते की त्यांना नेहमी ट्रिम करत राहणे. नियमित ट्रिम केल्याने केसांची वाढ खुंटत नाही.
वारंवार न धुता चांगल्या क्वालिटीचे अँटी डँड्रफ शाम्पू आणि इतर प्रॉडक्टचा वापर करा.
बाजारात अनेक प्रकारचे डीप कंडिशनिंग मास्क भेटतात त्यांचा वापर करून तुमचे केस हेल्दी ठेवा. आठवड्यातून एकदा मागचा वापर करणे उत्तम.
केस विंचरताना अगदी हळुवारपणे करा त्यासाठी योग्य प्रकारचा कंगवा वापरा.