Sudesh
आजकाल मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. कित्येक लोक झोपतानाही शेजारी मोबाईल ठेवतात.
यामुळे सकाळी उठल्यावर हे लोक पहिल्यांदा मोबाईल हातात घेतात.
मात्र, असं केल्यामुळे तुमची पर्सनॅलिटी, आयुष्य आणि दैनंदिन कामांवर नकारात्मक परिणाम होत आहे.
उठल्यावर पहिल्यांदा तुमचं मन अगदी शांत असतं. यावेळी एकाग्रता चांगली असते. मात्र, फोन घेतल्यामुळे मनाची एकाग्रता भंग पावते.
कित्येक वेळा रात्री चुकून जाग आल्यावर लोक मोबाईल पाहत राहतात, अशाने झोप पूर्ण होत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो.
सकाळी उठल्याबरोबर सोशल मीडियावर काही नकारात्मक गोष्ट दिसली, की दिवसभर आपल्या मनात निगेटिव्हिटी राहण्याचा धोका असतो.
पहाटेच्या वेळी डोळे उघडल्यानंतर पहिल्यांदा त्यावर फोनच्या स्क्रीनचा प्रकाश पडणं धोकादायक असतं. यामुळे डोळे खराब होतात, सोबतच डोकेदुखी, निद्रानाश आणि थकवा अशा समस्या जाणवतात.
सकाळी फ्रेश मूडमध्ये कामं झटपट आवरतात. मात्र, तुम्ही मोबाईल घेऊन बसलात तर हा वेळ पूर्णपणे वाया जातो.