रोहित कणसे
ऑस्ट्रेलिया अन् पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली असून यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा चर्चेत आला आहे.
ख्वाजा आयसीसीची परवानगी न घेता पॅलेस्टाईनच्या समर्थनात काळी पट्टी घालून मैदानावर उतरला होता ज्यामुळे वाद सुरू झाला आहे.
यानंतर आयसीसीने ख्वाजाला फटकारलं मात्र आता दुसऱ्या कसोटीत सामन्यात उस्मान ख्वाजा हा त्याच्या शूजमुळे चर्चेत आहे.
दुसऱ्या कसोटीत उस्मान ख्वाजा आपल्या मुलांचे नाव लिहिलेला शूज घालून मैदानात उतरला.
ख्वाजाच्या या शूजचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत .
उस्मान ख्वाजाने दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आपल्या बॅटवर इस्रायल-हमास युद्धासंदर्भातील मॅसेज लिहिलेले स्टीकर लावण्याची परवानगी मागितली होती.
आयसीसीने परवानगी नाकारल्यानंतर देखील ख्वाजा आपल्या मुलांची नावे लिहीलेले शूज घालून मैदानावर उतरला.
आयसीसीने ख्वाजाला यासंबंधी कुठलीही परवानगी दिलेली नाहीये.
आता आयसीसी ख्वाजावर काय कारवाई करेल याकडे क्रिकटे प्रेमींचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान दुसऱ्या कसोटीबाबत बोलायचं झालं तर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
वॉर्नर 38 धावा करून बाद झाला. उस्मान ख्वाजाने 42 धावा केल्या. पावसामुळे सामना काही काळ थांबला. 45 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 118 धावा झाल्या होत्या.
हिवाळ्यात इतकी जास्त झोप का येते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.