बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी उत्तराखंड राज्यातील 'या' ठिकाणांची करा निवड

Monika Lonkar –Kumbhar

उत्तराखंड

हिवाळ्यात जर तुम्ही देखील फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर उत्तराखंडमधील हिलस्टेशन्सची निवड करायला काही हरकत नाही. 

Uttrakhand

देवभूमी

उत्तराखंड या राज्याला 'देवभूमी' म्हणून खास ओळखले जाते. देवभूमीचे सौंदर्य हे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यातही खुलून दिसते. त्यामुळे, कोणताही ऋतू असुद्या या उत्तराखंड राज्यात पर्यटकांची नेहमीच रेलचेल पहायला मिळते.

Uttrakhand

धनोल्टी हिल स्टेशन

धनोल्टी हे ठिकाण उंच हिमालयाच्या मधोमध वसलेले एक सुंदर हिलस्टेशन आहे. हा शांत आणि पर्वतीय प्रदेश पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या परिसरात किल्ले, मंदिरे आणि विविध पर्यटनस्थळे आहेत.

Uttrakhand

साहसी खेळ

जर तुम्हाला कॅंम्पिंग आणि साहसी खेळ आवडत असतील तर तुम्ही धनोल्टी या हिलस्टेशनला भेट द्यायला काही हरकत नाही. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे, 

Uttrakhand

औली हिल स्टेशन

उत्तराखंड राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय हिल स्टेशन म्हणून या औलीचा उल्लेख केला जातो. या हिल स्टेशनवरील मनमोहक बर्फवर्षाव हा पाहण्यासारखा असतो.डिसेंबर महिन्यात अनेकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते.

Uttrakhand

कॅंम्पिंग

औली हे स्नोबोर्डिंग आणि स्कीइंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. पर्वत खोऱ्यांमध्ये वसलेल्या या ठिकाणाचा सुंदर नजारा डोळ्यांत साठवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॅंम्पिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

Uttrakhand

खिर्सू

उत्तराखंड राज्यातील हे आणखी एक सुंदर हिलस्टेशन आहे. हे हिल स्टेशन उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यामध्ये स्थित आहे. डिसेंबर महिन्यात येथे बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttrakhand