सकाळ डिजिटल टीम
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीनं जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय.
9 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
आता अलीकडंच हसन अलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. त्यामुळं त्याचं लोक खूप कौतुक करताहेत.
त्यानं इन्स्टाग्रामवर ऑल आइज ऑन वैष्णो देवी अटॅक या ट्रेंडच्या अनुषंगानं ही पोस्ट शेअर केलीये. दरम्यान, हसनची भारतीय पत्नी सामियाने ही त्यासंबंधीची तिची पोस्ट शेअर केली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीनं 2019 मध्ये सामियाशी लग्न केलं. सध्या सामिया तिचा पती हसन अलीसोबत दुबईत राहत आहे.
हसन अलीला T-20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघात स्थान मिळालेलं नाही.
हसन अलीची पत्नी मूळची हरियाणाची आहे. तिने फरिदाबाद येथून शिक्षण घेतलं आहे.
सामियाचं संपूर्ण कुटुंब हरियाणातील गुरुग्राममध्ये राहतं. ती फ्लाइट इंजिनियर असून तिनं एमिरेट्स एअरलाइन्ससाठी देखील काम केलं आहे.