‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्या निमित्ताने जोडीदारासोबत ‘या’ बजेट फ्रेंडली ठिकाणांना नक्की द्या भेट

Monika Lonkar –Kumbhar

व्हॅलेंटाईन्स डे

सध्या सर्वत्र 'व्हॅलेंटाईन्स डे' ची धामधूम पहायला मिळत आहे. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त अनेक कपल्स विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात.

Valentines day 2024

हा दिवस स्पेशल प्रकारे साजरा करण्यासाठी कपल्स उत्सुक असतात. काही कपल्स फिरायला जातात तर काही कपल्स एकमेकांना गिफ्ट्स देतात.

Valentines day 2024

कॅंडल लाईट डिनर

काही कपल्स कॅंडल लाईट डिनरचे ही प्लॅनिंग करतात आणि सोबत निवांत वेळ घालवतात. जर तुम्हाला यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डे ला फिरायला जायचे असेल तर, त्यासाठीची खास ठिकाणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Valentines day 2024

शिलाँग

मेघालय या राज्याची राजधानी असलेले शहर शिलाँग हे तिथल्या अनोख्या निसर्गसौंदर्यासाठी आणि खाद्यसंस्कृतीसाठी खास करून ओळखले जाते. या शहरातील पर्यटनस्थळांना अनेक देशी-विदेशी पर्यटक दरवर्षी भेट देतात.

Valentines day 2024

उंच डोंगरावर वसलेले हे शहर अनेक पर्यटकांना भुरळ घालते. या ठिकाणी भेट देण्यासाठी फेब्रुवारी हा उत्तम काळ आहे. शिलाँगमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊन जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवू शकता.

Valentines day 2024

होशर्ली हिल्स

आंध्र प्रदेश या राज्यातील हे एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही पार्टनरसोबत या ठिकाणी जाऊन तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ चांगल्या प्रकारे साजरा करू शकता. होशर्ली हिल्स हे ठिकाण समुद्रपाटीपासून १२६५ मीटर उंचीवर आहे. याशिवाय, तुम्हाला येथे जोडीदारासोबत ट्रेकिंगचा ही आनंद घेता येईल.

Valentines day 2024

ऋषिकेश

उत्तराखंड या राज्याचे नाव घेतल्यावर तिथली अनेक पर्यटनस्थळे आपल्याला आठवतात. या पर्यटन स्थळांपैकी ऋषिकेशचे नाव हे सर्वात आघाडीवर आहे. जर तुमच्या जोडीदाराला राफ्टिंग आणि ट्रेकिंगची आवड असेल, तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा नक्कीच विचार करू शकता.

Valentines day 2024

वारंवार उचकी लागते? मग, हे सोपे उपाय नक्की करा.

Health care | esakal
येथे क्लिक करा.