Anuradha Vipat
सध्या वर्षा उसगांवकर महेश कोठारे यांची निर्मिती असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे
वर्षा उसगांवकर यांनी एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयी एक खंत व्यक्त केली आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’च्या नो फिल्टर या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
त्यावेळी त्या म्हणाल्या, “मला असं वाटतं आज लक्ष्या असता तर तो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चमकला असता. मालिकांमध्ये त्याने खूप नाव कमावलं असतं.
पुढे वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘एक होता विदूषक’मध्ये लक्ष्याचा एक वेगळा पैलू आहे. लक्ष्याला त्या चित्रपटात खूप रस होता.
चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमांमध्ये वर्षा उसगांवकर यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवला आहे.