Anuradha Vipat
नुकताच बाबा झालेला वरुण आज पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करत आहे
यासाठी वरुणने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
वरुणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत.
पहिल्या फोटोमध्ये वरुणच्या गोंडस मुलीने त्याचं बोट पकडलंय असं दिसत आहे
तसेच दुसऱ्या फोटोमध्ये त्याने त्याच्या श्वानाचा हात हातात धरल्याचं दिसत आहे
“पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! या जगात मुलीचा बाबा होण्यापेक्षा जास्त आनंद नाही”, असे सुंदर कॅप्शन वरुणने या फोटोंना दिले आहे.
वरुणच्या या फोटोवर चाहत्यांबरोबरच कलाकारांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.