धनश्री भावसार-बगाडे
किचनमधल्या बऱ्याच गोष्टींविषयी वास्तूशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तूशास्त्रात चपात्या बनवतानाचे काही नियम सांगण्यात आले आहेत.
चपात्यांविषयीचे हे नियम जे दुर्लक्षित करतात त्यांच्याकडे कायम पैशाची चणचण जाणवते. संपन्नता त्यांच्या घरात येत नाही.
काही घरांमध्ये मोजून चपात्या करण्याची पद्धत आहे. याचा संपत्ती आणि आरोग्य दोन्हीवर विपरीत परिणाम होतो.
वास्तूतज्ज्ञ सांगतात की, कधीही मोजून चपात्या बनवू नये. उलट रोज ४-५ चपात्या जास्तीच्या बनवून ठेवाव्या.
तज्ज्ञ सांगतात की, पहिली चपाती कधीही घरच्यांना खायला देऊ नये. ती गाय, कुत्रा अशा पाळीव प्राण्यांसाठी असावी.
वास्तुनुसार पाहुण्यांसाठी सुद्धा चपात्या असाव्यात म्हणून २ चपात्या जास्तीच्या करून ठेवाव्यात.
भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव म्हटले जाते. घरी आलेल्या पाहूण्याला उपाशी न पाठवण्याची परंपरा आहे. त्यामुळे जास्तीच्या चपात्या असाव्या.
जर घरात पाहुणे नाही आले तर या उरलेल्या चपात्या गाय, कुत्रा किंवा पक्षांना खाऊ घालाव्या, यामुळे अन्नपुर्णेचीही कृपा प्राप्त होते.
वास्तूनुसार कधीही शिळ्या कणकेच्या चपात्या खाऊ नये. त्याचा संबंध राहूशी असतो.
शिळ्या कणकेच्या चपात्यांनी कौंटुंबिक क्लेश वाढतात. त्यामुळे कारण ताज्या कणकेच्या चपात्या खाव्या. त्यामुळे मंगळ स्ट्राँग होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.