कॅन्सर ते पोटाच्या समस्या कमी करण्यापर्यंत..; 'ही' पाने आरोग्यासाठी का आहेत फायदेशीर?

सकाळ डिजिटल टीम

अळूची पाने आरोग्यासाठी का आहेत फायदेशीर?

अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

Alu Leaves Benefits

अळूच्या पानांमध्ये कोणते घटक आहेत?

याच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते; जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.

Alu Leaves Benefits

या विकारांवर फायदेशीर

ब्लड प्रेशर :

अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्त्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या होत नाही.

Alu Leaves Benefits

दृष्टी :

अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

Alu Leaves Benefits

पोटाच्या समस्यांवर फायदेशीर :

तुम्हाला पोटाच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.

Alu Leaves Benefits

सांधेदुखीवर गुणकारी :

तुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल.

Alu Leaves Benefits

वजन कमी करण्यासाठी :

अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Alu Leaves Benefits

कॅन्सरचा धोका कमी

अळूच्या कंदात पॉलीफिनॉल्स विपूल प्रमाणात असतात. पॉलिफेनॉल्समुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. ट्यूमरसदृश्य पेशीही अळूच्या कंदाच्या सेवनाने कमी होतात.

Alu Leaves Benefits

गर्भावर परिणाम ते यकृतासाठी हानिकारक; कारले खाण्याचे कोणते आहेत फायदे-तोटे?

Karela Juice Benefits | esakal
येथे क्लिक करा