सकाळ डिजिटल टीम
इंटेलीजन टू-व्हीलर निर्माता कंपनी वेस्पा आपल्या स्टाइलिश आणि पॉवरफुल स्कूटरसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आता कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील सर्वात दमदार स्कूटर प्रदर्शित केला आहे.
कंपनीने आपल्या ग्लोबल मार्केटमध्ये नवीन स्कूटर वेस्पा GTS 310cc ची क्षमता असलेल्या लिक्विड-कूल्ड या इंजिनचा वापर केला असून हा नवीन इंजिन मागील मॉडेलच्या तुलनेत खूप अधिक पॉवरफुल आहे. मागील मॉडेलमध्ये कंपनीने 278cc चे इंजिन दिले होते.
कंपनीचा दावा आहे की, हे इंजिन २५bhp ची दमदार पावर आणि २७Nm चा टॉर्क जनरेट करतं. पॉवरच्या बाबतीत हा स्कूटर रॉयल एनफिल्ड बुलेटलाही मागे टाकतो. व रॉयल एनफिल्ड बुलेटचा ३५०cc इंजिन जास्तीत जास्त २०.२bhp पर्यंत पावर आउटपुट देतो.
वेस्पाच्या या नवीन स्कूटरबद्दल कंपनीचं म्हणणं आहे की, इंजिनमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे आता ते आधीपेक्षा अधिक स्मूथ आहे. या इंजिनमध्ये नवीन ECU आणि फ्यूल इजेक्टर दिले आहेत. वेस्पाचा दावा आहे की, या स्कूटरची टॉप स्पीड १३० किमी प्रति तासाच्या आसपास चालते
या स्कूटरमध्ये स्टँडर्ड म्हणून ट्रॅक्शन कंट्रोल आणि एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सारखी फीचर्स देखील समाविष्ट आहेत. वेस्पाच्या टाइमलेस क्लासिक डिझाइन लैंग्वेज पासून प्रेरित दिसत आहे. त्याच्या एप्रोनला स्टाइलिश बनवताना, अगदी क्लिन साइट पॅनेल्स देण्यात आले आहेत.
हा स्कूटर दोन व्हेरिएंट्समध्ये GTS सुपर आणि GTS सुपरस्पोर्ट म्हणून उपलब्ध असणार आहे. डिस्क ब्रेक्सने सुसज्ज असलेल्या या स्कूटरच्या व्हील्सवर ग्राफिक्सही दिले आहेत.
येथे क्लिक करा...