सकाळ डिजिटल टीम
'मदर ऑफ बॉलीवूड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निरुपा रॉय (Actress Nirupa Roy) यांनी अनेक चित्रपटांमध्ये 'आई'ची भूमिका साकारलीये.
विशेषत: अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांनी सर्वात जास्त आईची भूमिका केलीये. त्यावेळी निरुपा रॉय यांना अमिताभ यांची 'दुसरी आई' म्हटलं जात होतं.
निरुपा यांनी 'दीवार', 'खून पसीना', 'इन्कलाब', 'अमर अकबर अँथनी', 'सुहाग', 'गिरफ्तार', 'मुकद्दर का सिकंदर', 'मर्द' आणि 'गंगा-यमुना-सरस्वती' यांसारख्या चित्रपटांमध्ये अमिताभसोबत काम केलं आहे.
निरुपा रॉय यांचा जन्म गुजरातमधील वलसाड इथं झाला. निरुपा ह्या अवघ्या 14 वर्षांच्या असताना वडिलांच्या सांगण्यावरून त्यांचं लवकर लग्न झालं. त्यांच्या पतीचं नाव कमल रॉय होतं.
निरुपा रॉय यांचे पती कमल रॉय यांना मुंबईत येऊन अभिनेता व्हायचं होतं. यात निरुपा यांनी त्यांना साथ दिली आणि त्यांच्यासोबत मुंबईत आल्या. मुंबईत आल्यानंतर कमल रॉय चित्रपटांच्या ऑडिशनला जाऊ लागले.
एके दिवशी अचानक कमल यांनी निरुपा यांना आपल्यासोबत ऑडिशन घेऊन गेले. निरुपा यांनी ऑडिशन देताच त्यांची निवड झाली. यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली.
निरुपा रॉय यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 500 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक धार्मिक चित्रपटांमध्ये काम केल्यामुळं चाहते त्यांना 'देवी' मानून पूजायचे, संबोधायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.