सकाळ डिजिटल टीम
आपल्या कमाल डान्समुळे एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री हेलेन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
मूळच्या बर्माच्या असलेल्या हेलेन यांनी ग्रुप डान्सर म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
त्यांच्या भन्नाट डान्स स्टाईलमुळे कॅब्रे डान्सर म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये ओळख बनवली.
१९८१ मध्ये त्यांनी सलीम खानशी लग्न केलं आणि खान परिवारानेही त्यांना त्यांच्यात सामावून घेतलं.
हेलेन आता ८५ वर्षांच्या आहेत आणि आताही त्या त्यांच्या फिटनेसची काळजी घेत आहेत.
इतकं वय असूनही सध्या हेलेन पिलाटेची ट्रेनिंग घेत आहेत. त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तरीही त्या हि ट्रेनिंग घेत आहेत.
हेलेन यांच्या फिटनेसचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.
उतारवयातही हेलेन त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असून त्या स्वतःच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.