Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी ४ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेतला आहे.
पण असं असले तरी त्यांनी त्यांचा मुलगा अगस्त्याचे सहपालकत्व स्विकारल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, हार्दिकपासून वेगळे झाल्याचे जाहीर केल्यानंतर नताशा तिच्या घरी सर्बियाला गेली होती. तिच्यासह अगस्त्याही होता.
बरेच दिवस सर्बियाला राहिल्यानंतर आता नताशा पुन्हा भारतात आली आहे.
त्यामुळे अगस्त्य आणि हार्दिकची पुन्हा भेट झाली आहे. रिपोर्ट्सनुसार नताशापासून वेगळे झाल्याचे जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच हार्दिक अगस्त्यला भेटला आहे.
सध्या एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात मुंबईमध्ये हार्दिक त्याचा मुलगा अगस्त्य आणि पुतण्या कवीर यांना कडेवर घेऊन मस्ती करत आहे. तसेच नंतर तो त्याच्या कारमध्ये धावत आहे.
हार्दिक भारताच्या कसोटी संघातून बाहेर असल्याने सध्या त्याला सुटी मिळाली आहे कारण भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
हार्दिक आणि नताशा यांनी जानेवारी २०२० मध्ये साखरपूडा केला होता. त्यांनी २०२३ मध्ये दोन पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केले होते. दरम्यान, अगस्त्यचा जन्म जुलै २०२० मध्ये झाला आहे.