Anuradha Vipat
अभिनेत्री विद्या बालन सध्या ‘भुलभूलैय्या ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खुलासा
आता एका मुलाखतीत विद्या बालनने तिला करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याचा खुलासा केला आहे.
अभिनेत्री विद्या बालनने नुकतीच एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, तुमच्या आयुष्यात अशी कोणती परिस्थिती होती, ज्यावेळी तुम्हाला वाटले की त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.
यावर उत्तर देताना विद्या बालनने म्हटले, ” माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला नकाराचा खूप सामना करावा लागला.
पुढे विद्या बालनने म्हटले, मला कोणत्याही चित्रपटात घेतले जात नव्हते. तो काळ खूप कठीण होता. मी एका मल्याळम चित्रपटात काम करत होते. त्याचे शूटिंग सुरू झाले मात्र ते मध्येच बंद पडले.
पुढे विद्या बालनने म्हटले, त्यानंतर त्यांनी म्हणायला सुरुवात केली, ही मुलगी पनवती आहे. जेव्हापासून ही या चित्रपटाचा भाग बनली आहे, काही ना काही अडचणी येत आहेत