आईनेच विक्रांतला दिला गर्लफ्रेंडबरोबर लिव्ह इन मध्ये राहण्याचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

विक्रांत मासी

अभिनेता विक्रांत मासी '12th Fail' या त्याच्या सिनेमामुळे घराघरात पोहोचला. या सुपरहिट सिनेमामुळे अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स विक्रांतला मिळाले.

हसीन दिलरुबा २

विक्रांतचा आता 'हसीन दिलरुबा २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून यात तो तापसी पन्नू आणि सनी कौशलबरोबर काम करतोय.

गर्लफ्रेंड ते बायको

विक्रांत अभिनेत्री शीतल ठाकूर बरोबर दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. त्या आधी ते बराच लिव्ह इन मध्ये राहत होते.

आईचा सल्ला

एका मुलाखतीत विक्रांतने त्याच्या आईनेच त्याला लिव्ह इन मध्ये राहण्याचा सल्ला दिल्याचा खुलासा त्याने केला.

७ वर्षं रिलेशनशिप

आईच्या सल्ल्यामुळे विक्रांत आणि शीतलने लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ७ वर्ष लिव्ह इन मध्ये राहिल्यावर त्यांना एकमेकांविषयी बऱ्याच गोष्टी कळल्या आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं.

लग्नगाठ

विक्रांत आणि शीतलने दोन वर्षांपूर्वी कुटूंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं.

मुलाचा जन्म

त्या दोघांना वरदान नावाचा मुलगा आहे. २ ० २ ४ मध्ये वरदानचा जन्म झाला.

प्रीतीची विनेशसाठी खास पोस्ट - येथे क्लिक करा