कार्तिक पुजारी
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ही ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद झाली आहे
विनेश ५० किलो वजनी गटातून खेळत होती. मात्र, तिचे वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे
खेळाडू एका दिवसात वजन कमी करण्यासाठी खूप टोकाच्या पर्यायांचा अवलंब करतात
वॉटर वेट कमी करण्यासाठी खेळाडू खूप काळापर्यंत पाणी पित नाहीत. हे धोकादायक देखील असतं, कारण यामुळे अवयव निकामी होऊ शकतो
वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी ट्रेनिंग केली जाते. तसेच घट्ट, रबरी कपडे वापरले जातात. जेणेकरून घामाच्या स्वरूपात सर्व पाणी निघून जाईल
खेळाडू स्वत: डिहायड्रेट होतात, त्यामुळे शरीरातील पूर्ण पाणी निघून जातं. उपाशी राहतात. त्यामुळे थकवा, डोकेदुखी अन् चिडचिडपणा वाढतो.
काही खेळाडू जाणूनबुजून उलटी करतात किंवा जुलाब करण्याचा अवलंब करतात. या सर्व गोष्टी खेळाडूंसाठी अत्यंत घातक असतात.