राहुल शेळके
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर संपूर्ण देशात निराशा पसरली आहे.
दरम्यान, विनेश फोगटवर सरकारने किती पैसा खर्च केला हे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले आहे.
क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, सरकारने विनेशवर 70 लाख 45 हजार रुपये खर्च केले.
विनेशला प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, विनेश फोगटचे वजन सकाळी 7.10 आणि 7.30 वाजता मोजण्यात आले. विनेशचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.
विनेशकडे जागतिक दर्जाचा सपोर्ट स्टाफ होता. परदेशी प्रशिक्षकही देण्यात आला होता. विनेशच्या अपात्रतेबद्दल भारताने ऑलिम्पिक संघटनेकडे आपला निषेध व्यक्त केला आहे.
विनेश फोगटने 50 किलो फ्री स्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता पण वजन जास्त असल्याने अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले. यामुळे क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसला.
विनेश सुवर्णपदक जिंकेल अशी संपूर्ण देशाची अपेक्षा होती. विनेशने रात्री उशिरा 12:45 वाजता अंतिम सामना खेळला होता. आता तिला अपात्र ठरवण्यात आले. तीला रौप्य पदकही मिळणार नाही.