Swadesh Ghanekar
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर लांब भाला फेकला अन् भारताच्या नीरज चोप्राचे सुवर्णपदक हुकले.
नीरजला ८९.४५ मीटरसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर ग्रेनाडाचा अँडरसन पीटर ८८.५४ मीटरसह तिसरा आला.
अर्शदने ९२.९७ मीटर लांब भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली.
अर्शदने पाकिस्तानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले.
ऑलिम्पिक २०२४ मध्ये पाकिस्तानचे सात खेळाडूच सहभागी झाले होते आणि त्यात पदक जिंकणारा अर्शद हा एकमेव खेळाडू ठरला
अर्शद नदीमच्या सुवर्णपदकाने पाकिस्तानला पदक तालिकेत ५३व्या क्रमांकावर पोहोचवले आणि भारत ६४व्या क्रमांकावर आहे
अर्शदची मॅच पाहण्यासाठी तरुणी पॅरिसच्या स्टेडियममध्ये पोहोचली होती आणि पाकिस्तानी खेळाडूची कामगिरी पाहून ती थक्क झाली...
या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चाचा विषय बनला आहे.
रिदा अहमद असे तिचे नाव आहे आणि ऑस्ट्रेलियात राहणारी पाकिस्तानी वंशाची तरुणी आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीत रिदा अहमद उच्च पदावर काम करते.