Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी संमिश्र ठरली.
बंगळुरूला पहिल्या आठ सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला, परंतु नंतर शानदार पुनरागमन करत सलग सहा सामने जिंकले.
त्यामुळे बंगळुरूने ७ विजयांसह १४ गुण मिळवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवून अनेकांना आश्चर्यचकीत केले.
मात्र, प्लेऑफमधील एलिमिनेटर सामन्यात बंगळुरूला राजस्थान रॉयल्सने पराभूत केल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपले.
दरम्यान, स्पर्धेतील आव्हान संपल्याने सलग १७ व्या वर्षी बंगळुरूचं विजेतेपदाचे स्वप्न भंगले.
असे असले तरी स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
विराटने खास पोस्ट शेअर करत लिहिले, 'बंगळुरूच्या सर्व चाहत्यांचे नेहमीप्रमाणे आम्हाला प्रेम दिल्याबद्दल आणि आमचे कौतुक केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.'
विराटने आयपीएल 2024 स्पर्धेत शानदार कामगिरी केली. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू आहे. त्याने 15 सामन्यांत 154.70 च्या स्ट्राईक रेटने आणि 61.75 च्या सरासरीने 741 धावा केल्या.