Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात झाली. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात झाला.
या सामन्यात खेळताना बेंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
विराटने या सामन्यात 20 चेंडूत एका षटकारासह 21 धावांची खेळी केली.
त्यामुळे विराटने चेन्नईविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला.
या सामन्यानंतर विराटच्या चेन्नईविरुद्ध 32 टी20 सामन्यात 1006 धावा झाल्या आहेत.
विराट चेन्नईविरुद्ध 1000 धावा करणारा शिखर धवननंतरचा दुसराच खेळाडू आहे.
शिखरने सर्वात आधी चेन्नईविरुद्ध 1000 धावांचा टप्पा पार केला होता.
22 मार्च 2024 पर्यंत तरी शिखरच्या नावावर चेन्नईविरुद्ध 29 टी20 सामन्यांत 1057 धावा आहेत.