सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी उधळला विजयी गुलाल.!

Monika Lonkar –Kumbhar

विशाल पाटील

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे राहिलेले विशाल पाटील यांचा विजय झाला आहे.

संजय पाटील

भाजपचे संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. अखेर यात विशाल पाटलांनी विजय मिळवला आहे.

कॉंग्रेस

सांगलीची जागा संपूर्ण देशात चर्चेत होती. कारण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने विशाल पाटील या जागेवरून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते

उद्धव ठाकरे

काँग्रेस पक्षातर्फे विशाल पाटलांना सांगलीची जागा लढवायची होती. परंतु, जागावाटपात ही जागा शिवसेनच्या उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे विशाल पाटलांनी बंड केले होते.

चंद्रहार पाटील

शिवसेना उबाठा गटातर्फे निवडणुकीत उतरलेले पैलवान चंद्रहार पाटलांना जनतेची साथ काही मिळू शकलेली नाही.

वसंतदादा पाटलांचे नातू

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघातून विजयी गुलाल उधळला आहे.

विजयी गुलाल

विशाल पाटील सुरुवातीपासून मतमोजणीत आघाडीवर होते, त्यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि चंद्रहार पाटील यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला.

घरच्या मैदानात अमित शाहांचा दणदणीत विजय

येथे क्लिक करा.