Diwali Vacation Tourism : दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन आहे? महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं आहेत अप्रतिम

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत फिरायला जाण्याचा प्लॅन आहे?

दिवाळीत अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. तुम्ही देखील कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Diwali Vacation Tourism

महाबळेश्वर

मनमोहक हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरच्या सौंदर्याचा तुम्ही अनुभव घ्या. ऐतिहासिक महाबळेश्वर मंदिराला भेट द्या आणि स्वादिष्ट स्ट्रॉबेरीचा आस्वाद घ्या. निसर्गाच्या सानिध्यातलं हे एक उत्तम ठिकाण आहे.

Diwali Vacation Tourism

लोणावळा

लोणावळ्यातील सुंदर कार्ला लेणी, लायन्स पॉईंटला तुम्ही भेट देऊ शकता. येथील चिक्कीचा आनंद घ्यायलाही विसरू नका. कौटुंबिक सहलीसाठी हे योग्य ठिकाण आ

Diwali Vacation Tourism

माथेरान

माथेरान हे एक अतिशय मनमोहक हिल स्टेशन आहे. येथे टॉय ट्रेनच्या राइड्सचा आनंद घ्या, पॅनोरमा पॉइंट सारख्या व्यूपॉईंटचा ट्रेक करा आणि हिरवागार परिसराचा अनुभव घ्या.

Diwali Vacation Tourism

पुणे

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा, ओशो गार्डनर, आगा खान पॅलेस आणि इतर अनेक ठिकाणं तुम्ही पाहू शकता. तुळशीबागेत खरेदी करू शकता. शिवाय, स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचाही तुम्ही आनंद घेऊ शकता.

Diwali Vacation Tourism

मुंबई

मुंबई शहरात तुम्ही दिवाळी सुट्टी एन्जाॅय करु शकता. गेटवे ऑफ इंडिया सारख्या प्रतिष्ठित वास्तू, गजबजलेल्या बाजारपेठा आणि स्थानिक स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता.

Diwali Vacation Tourism

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरात तु्म्ही भव्य अजिंठा आणि वेरूळ लेण्या पाहू शकता. येथील खडकात कोरलेल्या लेण्या आणि या शहराच्या समृद्ध इतिहासाचा अनुभव घ्या.

Diwali Vacation Tourism

Diwali Vacation Tourism : हनिमून डेस्टिनेशन ते निसर्ग सौंदर्य...; दिवाळीत 'या' सुंदर ठिकाणांना जरुर भेट द्या

Diwali Vacation Tourism
येथे क्लिक करा