सकाळ डिजिटल टीम
श्रावण महिन्यात हवामान खूप सुंदर असतं. या सिझनमध्ये लोक आपल्या कुटुंबीय, मित्रांसह बाहेरगावी फिरायला जातात.
कुल्लू मनाली : ऑगस्टच्या मोसमात तुम्हाला डोंगर-दऱ्यांवरील वाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल, तर कुल्लू मनाली तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. इथं तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.
चेरापुंजी : पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी चेरापुंजी हे परफेक्ट ठिकाण आहे. इथं तुम्ही डेकर लिव्हिंग रूट ब्रिज, नोहकलिकाई फॉल्स, मावसमाई गुहा पाहू शकता.
माउंट अबू : जर तुम्ही दिल्लीत राहत असाल, तर राजस्थानमधील माउंट अबू हे हिल स्टेशन तुमच्या शहरापासून काही तासांच्या अंतरावर आहे. तुम्हाला फिरण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
जर तुम्हाला धार्मिक स्थळांना भेट देण्याची आवड असेल, तर भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान मथुरा, वृंदावन हे देखील तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. इथं तुम्ही मंदिरांना भेट देण्याबरोबरच संध्याकाळी यमुना किनाऱ्याच्या आरतीलाही उपस्थित राहू शकता.
पिंक सिटी या नावानं प्रसिद्ध असलेलं जयपूर हे राजस्थानमध्ये आहे. पर्यटनासाठीही हे सर्वोत्तम ठिकाण आहे. इथं तुम्ही जलमहाल, जंतर मंतर, हवा महल, मंदिर पॅलेस, लक्ष्मी नारायण मंदिर, सिटी पॅलेस, आमेर किल्ला, जयगड किल्ला, रामबाग पॅलेस पाहू शकता.
लोणावळा हे मुंबई आणि पुणे दरम्यान वसलेलं एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह या ठिकाणी येऊ शकता. इथं तुम्हाला पर्वतांसोबत अनेक धबधबेही पाहायला मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.