Monika Lonkar –Kumbhar
व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
'व्हिटॅमीन सी' ने युक्त असलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार दिसते. 'व्हिटॅमीन सी' ने परिपूर्ण असलेल्या पुदिना फेसपॅकबद्दल जाणून घेऊयात.
पुदिन्यामध्ये 'व्हिटॅमिन सी' चे भरपूर प्रमाण आढळते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याचा वापर प्रामुख्याने केला जातो.
पुदिन्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि ती पाने सुकवून त्याची पावडर बनवा.
२ चमचे पुदिन्याच्या पावडरमध्ये १ चमचा कडुलिंबाची पावडर मिसळा.
या तयार मिश्रणात आता २-३ थेंब गुलाबजल मिसळा. ही पेस्ट आता चेहऱ्यावर लावा.
१५-२० मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.