Monika Lonkar –Kumbhar
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' हे फेस सीरम अतिशय उपयुक्त आहे.
आजकाल वातावरणातील बदल, वाढते प्रदूषण, धूळ यांचा त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे, त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी फेस सीरमची मदत घेऊ शकता. हे सीरम घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घेऊयात.
सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे कोरफड जेल आणि २ चमचे गुलाबजल मिसळा.
गुलबाजल मिसळल्यानंतर त्यात व्हिटॅमिन सी सीरमची कॅप्सूल मिसळा.
त्यात व्हिटॅमिन सी सीरमच्या २-३ कॅप्सूल चांगल्या मिसळून घ्या.
त्यानंतर, यामध्ये ग्लिसरीन मिसळून सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे एकत्र करा. आता व्हिटॅमिन सी फेस सीरम तयार आहे.
हे फेस सीरम तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये साठवून ते फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता.