Saisimran Ghashi
अंग दुखी आणि पाय दुखणे यामुळे त्रास होतोय काय? यांचे कारण असू शकते कॅल्शियमची कमतरता.
व्हिटॅमिन डीची कमतरता शरीरात कॅल्शियमचे शोषण कमी करते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि पाय दुखणे सुरू होते.
पण चिंता करू नका, एक फळ आहे जे या समस्येवर गुणकारी ठरू शकते.
सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो, पण आजच्या धकाधकीच्या जगात सूर्यप्रकाशात बसण्याची वेळच मिळत नाही.
अशा वेळी,आहारातून व्हिटॅमिन डी मिळवणे गरजेचे असते. अंजीर हे फळ व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे.
रोज सुके अंजीर खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढते आणि पाय दुखणे कमी होतात.
सुक्या अंजीरमध्ये असणारे इतर पोषक तत्वे देखील हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
याशिवाय, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या आहारात अंजीरचा समावेश करा आणि पहा, पाय दुखणे कसे कमी होतात.