Saisimran Ghashi
पुरेपूर झोप आणि संतुलित आहार या आपल्या शरीराच्या प्रमुख दोन गरजा आहेत.
पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर थकवा जाणवतो आणि निरुत्साही वाटते. चिडचिड होते.
आपली झोप आणि आपल्या शरीरातील जीवनसत्त्वे यांचा निकटचा संबंध आहे.
बऱ्याचदा जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे किंवा रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे झोप येण्यात अडचण निर्माण होऊ शकते.
सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी, झोपेच्या चक्राला नियमित करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे झोपेच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
कमी झोप येणे, थकवा जाणवणे स्लिप डिसऑर्डर त्याचबरोबर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
जीवनसत्त्वांच्या कमतरतेबरोबरच तणाव, अनियमित जीवनशैली, काही औषधे आणि वैद्यकीय स्थितीही झोपेवर परिणाम करू शकतात.
ही माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.