डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे 'हे' व्हिटॅमिन; असा करा आहारात समावेश

Monika Lonkar –Kumbhar

डोळे

शरीराच्या सर्वात नाजूक अवयवांपैकी एक म्हणजे आपले डोळे होय. त्यामुळे, डोळ्यांची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Vitamins For Eyes

संतुलित आहार

डोळ्यांचे बाहेरून संरक्षण करण्यासोबतच त्यांचे पुरेशा प्रमाणात अंतर्गत पोषण होणे देखील आवश्यक आहे. डोळ्यांचे अंतर्गत पोषण करण्यासाठी संतुलित आहार फार महत्वाचा आहे.

Vitamins For Eyes

आपल्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या जीवनसत्वांचा आणि खनिजांचा समावेश असणे महत्वाचे आहे. यामुळे, आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. यासोबतच हा आहार आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो.

Vitamins For Eyes

व्हिटॅमिन्स

खरं तर या जीवनसत्वांची आणि पोषकघटकांची कमतरता निर्माण झाली की, वयासोबतच आपली दृष्टी कमी होते. ही दृष्टी कमी होण्यामागचे हेच प्रमुख कारण आहे. डोळ्यांची योग्य काळजी घ्यायची असेल तर आहारात काही व्हिटॅमिन्सचा जरूर समावेश करा. कोणते आहेत हे व्हिटॅमिन्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Vitamins For Eyes

व्हिटॅमिन ई

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. पालक, शेंगदाणे, बीट, सूर्यफूल, बदाम आणि मोहरीच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई चे पुरेसे प्रमाण आढळून येते.

Vitamins For Eyes

व्हिटॅमिन ए

डोळ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या पोषकतत्वांपैकी एक म्हणून या व्हिटॅमिन ए ला ओळखले जाते. हिरव्या पालेभाज्या, गाजर, रताळे, भोपळा, टोमॅटो, लाल शिमला मिरची, टरबूज, आंबा इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा.

Vitamins For Eyes

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन ई आणि ए प्रमाणेच व्हिटॅमिन सी हे आपल्या डोळ्यांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. मोसंबी, संत्रा, लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण आढळून येते. यासोबतच स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, काळी मिरी इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी चे विपुल प्रमाण आढळून येते.

Vitamins For Eyes

अंबानींच्या फंक्शनमध्ये आलियाचीच हवा..!

alia bhatt | esakal
येथे क्लिक करा.