चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, पंढरपुरातील विठूरायाचं रुप खुललं!

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल ऋक्मिणीची पूजा केली. यावेळी पूजेदरम्यान विठ्ठलाला सुंदर अशी भरजरी वस्त्रे परिधान करण्यात आलेली पाहायला मिळाली.

सोबतच ऋक्मिणी मातेलाही हिरवी आणि लाल-केशरी सोनेरी काठची पैठणी नेसविण्यात आली. यावेळी विठ्ठल रूक्मिणीचे हे रूप खूपच सुंदर दिसत आहे.

पहाटेच्या पूजेवेळी विठ्ठल रूक्मिणी यांना सजविण्यात आले. यावेळी विठ्ठलाला जांभळ्या रंगाचं सोवळं परिधान करण्यात आलं. तर पिस्ता रंगाचा भरजरी नक्षीकाम असलेला सुंदर रेशमी कुर्ता परिधान करण्यात आला.

विठ्ठल ऋक्मिणीचे हे देखणे रूप खूपच सुंदर दिसत आहे. रेशमी वस्त्रांनी सजविण्यात आलेल्या आपल्या विठुरायाला आणि ऋक्मिणीला पाहण्यासाठी, भाविक पंढरपूर येथे हजेरी लावत आहेत.

आज ऋक्मिणी मातेचेही रूप पाहण्यासारखे आहे. सुंदर मेंदीच्या रंगाची आणि लाल-केशरी सोनेरी काठ असलेली नक्षीदार पैठणी ऋक्मिणी मातेला परिधान करण्यात आली. सोबत नथही घालण्यात आली आहे. तसेच मंगळसूत्रही परिधान करण्यात आले आहे.

यावेळी आषाढी सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत

एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्यने पंढरपुरात दाखल झाले आहेत.

त्याचबरोबर संतांच्या पालख्या देखील मोठ्या संख्येने पंढरपुरात पोहोचल्या आहेत. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागा भाविकांनी भरली आहे.