अंकिता खाणे (Ankita Khane)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी रशियाची राजधीनी मॉस्कोमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना तिथे ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
मोठ्या उत्साहात पुतिन यांनी मोदींचे स्वागत केले. त्यामुळे पुतिन चर्चेत आले आङे
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची गणना ही जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये आवर्जून केल जाते.
पुतिन यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना दरवर्षी १४,०००० डॉलर (११.७ कोटी) पगार मिळतो.
पुतिन यांच्या तुलनेत मोदींच्या वार्षिक पगारावर नजर टाकल्यास मोदींना वर्षाला केवळ 19,92,000 लाख रूपये मिळतात.
पुतिन आणि मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी तफावत आहे.
मोदींकडे एकूण ३.०२ कोटींची संपत्ती आहे तर पुतिन यांची एकूण संपत्ती ही २०० अब्ज डॉलर्स (१६ लाख कोटी रूपये) आहे.
पुतिन यांच्या संपत्तीबाबत २००७ मध्ये अमेरिकेच्या सिनेट न्यायपालिकेला एक अहवाल सादर करण्यात आला होता.
या अहवालानुसार, पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून पुतिन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला होता.
परंतु, २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाने पुतिन यांच्या मालमत्तेची पडताळणी करता येत नाही.
त्यामुळे, त्यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट करणे कठीण असल्याचे सांगितले होते.