Aishwarya Musale
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही. दररोजचा कामाचा ताण, बदलती जीवनशैली अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या शरीराची नीट काळजी घेत नाही.
मग फास्टफूड खाण्यावर भर, एकाच जागी बसून काम करणं या गोष्टींमुळेच आपल्या शरीराची जास्त हालचाल होत नाही, त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
तुम्हाला माहितीये का की तुम्ही सकाळी उठून काही नियम फॉलो केले तर तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं.
सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वात आधी एक ग्लास पाणी पिलं पाहिजे. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. जे आपले मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते.
दररोज नियमीत व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. दररोज 20 ते 25 मिनिटे व्यायाम करावा.
तुम्हाला जर फिट राहायचे असेल तर दररोज सकाळी नाष्टा करावा. तुम्ही नाष्टा केल्यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते. तसंच यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही
तुम्ही बाहेरील खाणंही बंद करू शकता. तसंच सकाळच्या नाष्ट्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट या गोष्टींचा समावेश करा आणि पौष्टिक आहार घ्या.
फिट राहण्यासाठी दररोज सकाळी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्या. कारण यामधील काही घटक मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी मदत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.