सकाळ डिजिटल टीम
सकाळी चालण्याचा व्यायाम हा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. सकाळी नियमित फिरायला गेलात, तर आजारांचा निम्मा धोका दूर होऊ शकतो.
ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात 30 दशलक्षाहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले की, 'दिवसातून किमान 11 मिनिटे चालणे 10 पैकी एक अकाली मृत्यू टाळू शकते.'
या धावपळीच्या जीवनात तुम्ही तुमच्या शरीरासाठी एक तास द्यावा. डॉक्टरही व्यायामाचा सल्ला देतात. एका संशोधनात असं दिसून आलंय की, दररोज नियमित व्यायाम करणाऱ्या सहापैकी एक व्यक्ती अकाली मृत्यू टाळू शकतो.
यासोबतच वृद्धापकाळात निरोगी राहण्यासाठी व्यायामही आवश्यक आहे. खराब जीवनशैली आणि वाढते वय अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करून तुम्ही या आजारांपासून मुक्त होऊ शकता.
दररोज नियमित व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. संशोधनात असं आढळून आलंय की, अकाली मृत्यूचा धोका 23 % कमी होतो. हृदयविकाराचा धोका 17 % कमी होतो. कर्करोगाचा धोका 7 % कमी होतो.
सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. या काळात तुम्ही ध्यान देखील करू शकता. लोकांशी संवाद साधण्यासाठी हा उत्तम काळ आहे.
सकाळी चालण्याने दिवसभर ऊर्जा मिळते. चेहऱ्यावर चमक आणि आनंद कायम राहतो. यामुळे चिडचिड कमी होते आणि इतर लोकांसोबत तुमचे वागणे देखील सभ्य राहते.