सकाळ डिजिटल टीम
शरीर निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीचे पालन करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. आजकाल व्यस्त जीवनामुळे लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी वेळ काढता येत नाहीये.
निरोगी शरीरासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. व्यायामाच्या अभावामुळे आपल्या शरीरात अनेक गंभीर आजार होतात.
त्यापैकी हृदयविकाराचा झटका, हार्ट ब्लॉकेज आणि स्ट्रोक यासारखे हृदयाशी संबंधित आजार आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
डॉक्टरांच्या मते, चालणे हा हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. चालताना तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल हृदयाचे आरोग्य सुधारते आणि अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करते.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, चालण्याने खराब कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य मजबूत होतेच. शिवाय, वजनही वेगाने कमी होते.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही दिवसातून 45 मिनिटे न थकता चालत असाल तर याचा अर्थ तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले आहे.
त्याच वेळी, जर चालल्यानंतर 15 ते 20 मिनिटांच्या आत तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला किंवा तुम्हाला धडधडायला लागलं, तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.
दररोज 45 मिनिटे चालण्याचा नियम असला तरी प्रत्येकाने चालणे गरजेचे नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा नियम तरुणांना लागू होतो.
जर 35 वर्षांची व्यक्ती एका तासात 4 ते 5 किलोमीटर चालत असेल तर याचा अर्थ असा होतो की, त्याचं हृदय निरोगी आहे. परंतु, जर 75 वर्षांची व्यक्ती एका तासात 2 ते 3 किलोमीटर चालत असेल तर त्याचं हृदय देखील चांगलं असतं. म्हणजेच, तुमच्या हृदयाचे आरोग्य तुमचं वय आणि लिंग यावरही अवलंबून असतं.