कार्तिक पुजारी
सगळ्यांना दीर्घायुष्य जगण्याची इच्छा असते. पण, सध्या १०० वर्षांपेक्षा जास्त जगणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होऊ लागली आहे.
GeroScience मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार जास्त वर्षे जगण्यासाठी चार गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरू शकतात
आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. विभिन्न अनपदार्थांचा आहारात समावेश केल्याचा फायदा होता. मीठाचे सेवन कमी करा.
जास्त आयुष्य जगण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. कोणत्याही अडथळ्याविना ८-९ तासांची झोप तुम्हाला १०० वर्षांपेक्षा जास्त जगण्यास मदतीची ठरते
भरमसाट औषध खाण्याचा शरीरावर विपरीत परिणाम पडतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तेव्हाच गोळ्या खा
शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन तुम्हाला अधिक जगण्यासाठी फायद्याचे ठरू शकतं. ग्रामीण भागात राहणारे व्यक्ती जास्त जगतात असं रिपोर्ट सांगतो
त्यामुळे तुम्हालाही दीर्घ आयुष्य लाभावं असं वाटत असेल तर वरील गोष्टींकडे लक्ष द्या