Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना पगार देखील देत होते.
सर्व सैनिकांना ते रोख रक्कम देत असत
ही रोख रक्कम व्यापाऱ्यांकडून आणली जात असे
सैनिकांचे पगार हे ठिकठिकाणी "वराता" पद्धतीने दिले जात होते
वराता हा चेकसारखा प्रकार पाठवून व्यापाऱ्यांकडून रोख रकमा घेऊन तो सैनिकांना देण्यात येई.
सेतुमाधवराव पगडी, मोगल आणि मराठे पृ. ७४-७५, यामध्ये याचा उल्लेख आहे, शिवकालमध्ये देखील लिहलं आहे
घोडदळातील प्रत्येक बारगीरास त्याच्या दर्जाप्रमाणे दोनपासून पाच होनपर्यंत पगार दरमहा असे.
शिलेदारास सहा होनपासून बारा होनापर्यंत पगार असे.
जुमलेदारास अडीचशे होन तैनात व पालखी यांची तैनात असे.
सुभेदारास वर्षाचे सहाशे होन तैनात व पालखी, पाच हजारीस दोन हजार होन वार्षिक तनखा पालखी व अबदागीर अशी नेमणूक असे.
शिलेदाराचे सुभेदार अर्थात निराळे असून ते सगळे सरनोबताच्या हुकमात असत.