Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साखर होती का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होत असतो.
आनंदाच्या गोष्टी घडल्या तर आपल्याकडे साखर वाटण्याची पद्धत आहे.
सतराव्या जिजाऊंचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील लखुजीराव जाधव यांनी हत्तीवरुन साखर वाटली होती.
पण इंग्रज आल्यानंतर आपल्याला चहा आणि साखरेची सवय लावली मग सतराव्या शतकात साखर कुठून आली असा प्रश्न उपस्थित होतो.
पण तुम्हाला माहिती आहे का? साखरेचा शोध इंग्रजांनी नाही तर भारतीयांनी हजारो वर्षांपूर्वी लावला.
ईशान्य भारतातील सुपीक खोरी व दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटे येथे उसाची सर्वांत प्रथम उपज झाल्याचे मानतात.
भारतातील ऊस इ. स. पू. १८००– १७०० दरम्यानच्या काळात चीनमध्ये गेला होता.
उसाचा रस उकळून कच्ची साखर तयार करण्याचे तंत्र गंगेच्या खोऱ्यातील लोकांकडून मिळाल्याचे अनेक चिनी लेखकांनी लिहून ठेवले आहे.
त्यानंतर अरबी पर्शियन लोकही साखरेचा उपयोग करायला भारतीयांकडून शिकले, त्यांनी भूमध्य खोऱ्यात उसाची लागवड केली.
त्यानंतर पॅलेस्टाइनमधून युद्धातून परतलेल्या सैनिकांनी युरोपात साखर आणली, व्हेनीस शहर हे साखरेच्या व्यापाराचे केंद्र बनले होते.
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज व स्पॅनिश लोकांनी ऊस अटलांटिक महासागरापलीकडे नेला.
म्हणजे भारताने शोध लावलेली साखर जगभरात पोहचली. भारतातला पहिला साखर कारखाना हुबळी येथे १७८४ साली सुरू झाला.
१७९१ या वर्षी भारताने ग्रेट ब्रिटनला ९६ क्विंटल साखर उत्पादन केल्याचे उल्लेख आढळतात.
याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या काळातही साखर होती.
१८८२ साली पुण्याजवळच्या मांजरी येथे भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र सुरू झाले.
महाराष्ट्रातले शेतकरी ऊसाचे पीक घेत होते याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रात आढळतात.
पेशवाईच्या काळात जेवणानंतर पाहुण्यांना साखर दिली जात असे, लाडवात साखर घातली जात असे त्यांच्या दफ्तरावरून दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.