श्रावण महिन्यात अजय देवगण, अक्षय कुमार, सारा अली खानच्या 'या' चित्रपटांचा घ्या आनंद; काय आहे खास?

सकाळ डिजिटल टीम

'या' चित्रपटांचा आनंद घेऊ शकता..

पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्याला भगवान शिवाचा महिना देखील म्हणतात. या श्रावण महिन्यात तुम्ही 'या' चित्रपटांचा आनंद घेऊ शकता..

Shravan Movies

'ब्रह्मास्त्र'

या यादीत रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट ब्रह्मास्त्रचं नाव प्रथम येतं. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात भगवान शिवाचा महिमा दाखवण्यात आला आहे. 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी हा एक होता.

Shravan Movies

'ओएमजी 2'

या यादीत अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' या चित्रपटाचंही नाव आहे. या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. या चित्रपटाची कथाही अगदी नवीन होती. या चित्रपटात पंकज त्रिपाठीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

Shravan Movies

'केदारनाथ'

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं 'केदारनाथ' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतही दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तुम्हीही शिवभक्त असाल तर हा चित्रपट बघू शकता.

Shravan Movies

'शिवाय'

या यादीत अजय देवगणच्या 'शिवाय' चित्रपटाचंही नाव आहे. अजय देवगणच्या या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. जर, तुम्ही श्रावण महिन्यात भगवान शिवावर बनवलेले चित्रपट पाहण्यास उत्सुक असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Shravan Movies

कारगिल युद्धावर बनलेत 'हे' अप्रतिम चित्रपट; जीव धोक्यात घालून सैनिकांनी 'पाक'वर मिळवला होता विजय

येथे क्लिक करा