Swapnil Kakad
भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी शिमोगच्या शरावती नदीच्या खोऱ्यातुन ८२९ फूट उंचीवरून वाहणारा 'जोग वॉटरफॉल'.
केरळचा सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठा असलेला ८० फूट उंचीचा 'अथिरप्पिल्ली वॉटरफॉल'.
दुधाच्या समुद्रासारखा भासणार गोव्यातील प्रसिद्ध धबधबा 'दूधसागर वॉटरफॉल'.
चेरापुंजीच्या पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे ११०० फूट उंचीवरून कोसळणारा हा 'नोहकालिकाई वॉटरफॉल'.
नर्मदा नदीपासून उगम पावणारा 'धुंधर वॉटरफॉल' हा जबलपुर इथे आहे.
९० फूट उंचीवरून वाहणारा आणि इंद्रावती नदीवर वसलेला एक सुंदर 'चित्रकोट धबधबा' हा छत्तीसगडमध्ये आहे.
धबधब्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या छत्तीसगडमध्ये असलेला 'तीरथगड धबधबा' हा अनेक फॉल्समध्ये विभागला जातो आणि आपल्या ह्यच सुंदर दृश्याने पर्यटकांना आकर्षित करत असतो.
कूर्गमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी असलेला 'इरुप्पू वॉटरफॉल' हा १७० फूट उंचीवरून ब्रह्मगिरी टेकड्यांवरून वाहतो.