सकाळ डिजिटल टीम
टरबूजाच्या बियांमध्ये Vitamin B आणि Folate असते, जे बाळाच्या आणि आईच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. ही जीवनसत्त्वे डोळ्यांसाठीही फायदेशीर आहेत.
जर तुम्ही गर्भवती महिला असाल, तर फक्त टरबूजच नाही तर त्याच्या बिया देखील तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
टरबूजाच्या बियांमध्ये तांबे, जस्त, सेलेनियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी शरीरासाठी आवश्यक असलेली खनिजे असतात. बाळाच्या निरोगी विकासासाठी हे फायदेशीर आहे. बाळाची हाडे, दात आणि हिरड्यांसाठी देखील उपयुक्त आहे.
गर्भधारणेदरम्यान, टरबूजाच्या बिया हेल्दी स्नॅक म्हणून काम करतात. जे तुमची स्नॅक्स खाण्याची इच्छा पूर्ण करू शकतात. यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे बाळाच्या विकासातही मदत होते.
गरोदरपणात शरीराच्या काही भागांचा रंग बदलतो आणि तिथे Pigmentation होऊ लागते. यावेळी, टरबूज बिया नैसर्गिक Detoxifier म्हणून काम करतात.
गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक बदल दिसून येतात. यावेळी अनेक Hormonal बदल होतात. या बदलांमुळे होणारे Muscle Cramps बरे करण्यासाठी टरबूजाच्या बिया फायदेशीर आहेत.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.