मुलांना 'मोबाईल'पासून दूर ठेवायचे आहे? पालकांसाठी सोप्या ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

दोन वर्षांच्या मुलांनाही हल्ली मोबाईलची सवय लागली आहे. मोबाईल घेतल्याशिवाय मुलं जेवत नाहीत आणि मोबाईल काढून घेतला रडारड सुरू करतात. म्हणून मग पालकही नाईलाजाने मुलांकडे मोबाईल सोपवतात.

childrens | esakal

पण अशाने त्यांची मोबाईलची सवय दिवसेंदिवस वाढतच जाते. मोबाईल फक्त मुलांच्या डोळ्यांसाठी हानिकारक नसून त्यांचा आरोग्यावरही परिणाम होतो. जसे की लठ्ठपणा, चिडचिडा स्वभाव, कमकुवत दृष्टी अश्या अनेक समस्या उद्भवतात.

childrens | esakal

उपाय

मुलांपासून मोबाईलची सवय सोडवण्याचे सोपे मार्ग कोणते हे आपण जाणून घेऊयात.

childrens | esakal

पालकांचे अनुकरण

पालकांचे वागणे मुलं टिपत असतात. त्यामुळे पालकांनी घरामध्ये मोबाईलचा वापर कमी करायला हवा.

childrens | esakal

मोबाईलचा हट्ट

मुलं जेवत नसली की सोपा उपाय म्हणून पालक त्यांना मोबाईल देतात, तसं करणं आधी टाळा.

childrens | esakal

कामाचे वेळात्रक

पालकांनी मुलांच्या रोजच्या कामाचे वेळापत्रक बनवावे, त्यात मोबाईलसाठी थोडा वेळ ठेवल्यास हरकत नाही

childrens | esakal

विविध ॲक्टीव्हिटी्स

मुलांना फावल्या वेळेत विविध चित्रकला, गायन, वादन आदींमध्ये गुंतवावे.

childrens | esakal

मैदानी खेळ

मुलांना दररोज किमान १-२ तास मैदानी खेळ खेळण्यास पाठवावे.

childrens | esakal

पुरेशी झोप

मुलांना मोबाईलपासून जितके जमेल तितके दूर ठेवा खासकरून झोपताना.

childrens | esakal

मुलांसोबत वेळ घालवा

पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांना एकटे वाटणार नाही आणि ते मोबाईलमध्ये वेळ घालवणार नाहीत.

childrens | esakal

घरात या दिशेला चुकूनही ठेवू नका झाडू, होईल मोठं आर्थिक नुकसान

broom | esakal
येथे क्लिक करा