मकर संक्रांतीला या पाच रंगांचे कपडे परिधान करणे मानले जाते शुभ...

Aishwarya Musale

मकर संक्रांत

मकर संक्रांत साजरी करण्यासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या काही विषेश परंपरा आणि प्रथा आहेत. हा सण पंजाबमध्ये लोहरी, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी खिचडी उत्सव अशा नावांनी ओळखला जातो.

Makar Sankranti | Sakal

यंदा 15 जानेवारीला मकर संक्रातं साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात धार्मिक विधी आणि पूजेमध्ये रंगांवर विशेष लक्ष दिले जाते.

Kite | Sakal

शास्त्रानुसार सणासुदीच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगांचे कपडे परिधान केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा होते.

Makar Sankranti cloths

रंग लाल

लाल रंगाला हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते. महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहील.

Makar Sankranti Red Cloths | Sakal

पिवळा रंग

पिवळा रंग देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्री हरीच्या कृपेने सौभाग्य प्राप्त होते.

Makar Sankranti Yellow cloths | Sakal

भगवा किंवा केशरी

भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो. हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीही हे रंग परिधान करू शकता. भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहे.

गुलाबी रंग

गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निदर्शक मानला जातो. हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो. असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते.

हिरवा रंग

हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात रिद्धी-सिद्धींचे आगमन होईल, असे मानले जाते.

प्रभू श्रीरामाच्या नावावरून ठेवा मुलांची पवित्र नावे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keep holy names of children after the name of Shri Rama | Sakal
येथे क्लिक करा