सकाळ डिजिटल टीम
जागतिक मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन, 13-राष्ट्रीय संस्था जगभरात चक्रीवादळांना नाव देतात.
या दोन्ही संघटनातील समाविष्ट 13 देशांमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन यांचा समावेश आहे.
आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये, अशी एक नियमावली देखील तयार करण्यात आली आहे.
ते लिंग, राजकारण, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतींबाबत तटस्थ असतात.
चक्रीवादळाला देणारे नाव कोणत्याही देशाचा अपमान करणारे नसावे, असेही यात नमूद केले आहे.
एकदा एखादे नाव वापरले, की ते पुन्हा वापरता येत नाही.
देशांनी दिलेल्या नावांची यादी तयार केली आहे.
बंगालच्या खाडीत आलेल्या रेमल चक्रीवादळाला नाव ओमानने दिलं आहे. ‘रेमल’ हा अरबी भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ वाळू किंवा रेती असा होतो.