priyanka kulkarni
यंदा वीकेंडला प्रेक्षकांना ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
या आठवड्यात विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट (Movie) आणि वेब सीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत.
जाणून घेऊयात ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा,अभिनेत्री राशि खन्ना आणि दिशा पटानी यांचा योद्धा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
युद्धा हा चित्रपट मार्च महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला होता. पण ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकणार आहेत.
अभिनेता फहाद फासिलचा आवेशम हा मल्याळम चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
आवेशम हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.जीतू माधवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
'मर्डर इन माहिम' ही वेब सीरिज जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
मर्डर इन माहिम या वेब सीरिजमध्ये आशुतोष राणा, शिवाजी साटम, विजय राज हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.