सकाळ डिजिटल टीम
तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, पण सुरुवात कुठून करावी हे माहित नसेल, तर आधी सॅलडचा आहारात समावेश करा.
वजन कमी करण्यासाठी शरीराला फायबर आणि प्रथिने आवश्यक असतात. यासोबतच तुमच्या कॅलरीजवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे. म्हणूनच या सॅलडची रेसिपी जाणून घ्या जी तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.
सर्व प्रथम काळे हरभरे स्वच्छ धुवा आणि रात्रभर भिजत ठेवा. जर तुम्ही भिजवायला विसरला असाल तर प्रेशर कुकरमध्ये दोनदा शिट्ट्या करून हरभरे हलके शिजवून घ्या.
यानंतर मक्याचे दाणे ७-१० मिनिटे उकडवा.
यासाठी तुम्हाला एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्ह लागेल. जर तुम्ही मायक्रोवेव्ह वापरत असाल तर ते १८० डिग्री सेल्सिअस तापमानात प्री-हीट करा.
यानंतर एका वाटीमध्ये काळे हरभरे, मक्याचे दाणे, तेल आणि पेरी-पेरी मसाला घालून चांगले मिसळा. मसाला मिक्स झाल्यावर वाटी मायक्रोवेव्हमध्ये ८-१० मिनिटे ठेवा.
त्याचप्रमाणे हरभरा आणि मक्याचे मिश्रण एअर फ्रायरमध्ये ठेवा. २०० डिग्री सेल्सिअस तापमानावर ठेवा आणि १० मिनिटे तळू द्या. हरभरा आणि मक्याचे दाणे तळून झाल्यावर बाजूला ठेवा.
आता प्लेटमध्ये बारीक चिरलेली कोबी आणि लेटस(कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाल्याचा प्रकार) सोबत काकडी, दही, मीठ आणि काळी मिरी मिक्स करा. त्यावर हरभरा आणि मका टाका. वर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळून सॅलडचा आनंद घ्या.
या सॅलडमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या टाकू शकता आणि तुमच्या आवडीनुसार मसाले वाढवू किंवा कमी करू शकता. हे स्वादिष्ट सॅलड तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत करेल.